महाराष्ट्रात कॉग्रेंस पक्षाला लोकसभेकरिता एक जागा मुस्लिम समाजास द्यावी – मो मुनव्वर खान : आगामी लोकसभा निवडणुकी बाबत संभाजीनगर येथे महत्वपूर्ण बैठक संपन्न :

भुसावळ – महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यॉक कल्याण समिति मराठवाडा अल्पसंख्यॉक कल्याण समिति जिल्हा अध्यक्ष प्रदेश पदाधिकारी यांची आगामी लोक सभा निवडणुकी बाबत महत्वपूर्ण बैठक नुकतीच दिनांक 3 फेब्रुवारी रोजी संपन्न झाली . संभाजीनगर येथील सुबेदारी गेस्ट हाउस येथे प्रदेश अध्यक्ष मो मुनव्वर खान यांच्या प्रमुख उपस्थिति आयोजित बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा विनिमय करण्यात आला तसेच महाराष्ट्रात कॉग्रेंस पक्षाला लोकसभा साठी एक जागा मुस्लिम समाजला द्यावी अशी एकमुखी मागणी करीत सर्वांचे संमतीने यावेळी ठराव मंजूर करण्यात आला .
बैठकीत प्रदेश अध्यक्ष मो मुनव्वर खान यांचा सत्कार हरचरण सिंह गुलाटी प्रदेश उपाध्यक्ष यांनी केला .
या नंतर प्रस्तावित व सुत्र संचलन प्राध्यापक श्रीमती शमीम आरा संभाजीनगर महीला जिल्हाअध्यक्ष यानी केले
या आढावा बैठकीत मुनव्वर खान यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की , लोक सभा निवडणुकीमध्ये सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा या प्रसंगी प्रदेश सचिव सलीम काझी, प्रदेश उपाध्यक्ष हरचरण सिंह गुलाटी, तब्बू पटेल जिल्हा अध्यक्ष ईसाक कुरैशी महीला जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक शमीम आरा,तैय्यब पटेल,कलीम भाई तैव्वकीर फारुकी आदी उपस्थित होते