भुसावळ : भुसावळ तालुक्यातील सुसरी येथे बंद घरातून चोरट्यांनी तब्बल तीन लाख 10 हजारांची रोकड लांबवल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वरणगाव पोलिसात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दिलीप पंडित पाटील (62) हे शेतकरी सुसरी येथे परिवारासह वास्तव्यास आहेत. 2 मार्च रोजी सकाळी 11 ते 5 दरम्यान त्यांच्या बंद घराचे कूलूप बनावट चावीने उघडून चोरट्यांनी कपाटातील तीन लाख 10 हजारांची रोकड लांबवली. सायंकाळी शेतकरी कुटूंब घरी आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. वरणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तपास सहाय्यक फौजदार श्रावण जवरे करीत आहेत.



