भुसावळात ‘गण गण गणात बोते’च्या गजरात भाविक तल्लीन : श्रीगजानन महाराज प्रगट दिन उत्साहात साजरा : दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी : भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ :

भुसावळ : येथिल जामनेर रोडवरील श्री गजानन महाराज देवस्थान तर्फे आज दि.३ रोजी श्री संत गजानन महाराज यांच्या १४६ व्या प्रगट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . या निमित्त मंदिरास विद्युत रोषणाई करण्यात आली होती . मंदिराचे सभागृह मंडपात सामूहिक पारायणासह विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. प्रसंगी भाविकांच्या ‘गण गण गणात बोते’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला . भुसावळ – प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही श्री गजानन महाराज प्रगटदिना निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले . प्रारंभी श्रींचे स्नान अभिषेक पूजा सकाळी ५:३०. ते ७:३० पर्यंत झाली. तसेच भक्तांनी उदंड प्रतिसाद देत सकाळी ६ वाजेपासून ‘गण गण गणात बोते’ चा जयघोष केला . प्रारंभी सामूहिक पारायणाचे वाचन करण्यात आले . दरम्यान भक्तांना पिठलं-पोळी, बुंदीचे लाडूचा महाप्रसाद वाटप सकाळी ९ ते रात्री उशीरापर्यंत करण्यात आले .
यावेळी अनेक भाविकांनी महाप्रसादासाठी साहित्य तसेच देणगी जामनेर रोड वरील गजानन महाराज मंदिरास दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंदिराचे ट्रष्टी , आयोजक , पुजारी व भक्तांनी परिश्रम घेतले .