राजोरे - यावल तालुक्यातील एल एम पाटील विद्यालय, राजोरे, येथे नुकतीच विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्ती कार्यशाळा आणि पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आली.
या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक गिरीश पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन मधुकर दादा नारखेडे, प्रमुख वक्ते म्हणून दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालय भुसावळ येथील भौतिक शास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ दयाघन एस राणे व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांचे राज्य संघटक चंद्रकांत चौधरी आणि राजोरे येथील सामाजिक कार्यकर्ते मयूर महाजन उपस्थित होते.
आपल्या प्रमुख भाषणात प्रा डॉ दयाघन राणे यांनी विद्यार्थ्यांना व्यसनाचे प्रकार समजावून सांगून अमली पदार्थांचे शरीरावर कसे परिणाम होतात हे समजावून सांगितले. तसेच व्यसनाचा कुटुंबावर आणि समाजावर काय परिणाम होतो हे विविध उदाहरणे देवून समजावून सांगितले. त्याच प्रमाणे विद्यार्थ्यानी मोबाईल फोन पासून दूर राहावे हे सांगत मोबाईल फोन च्या दुष्परिणामांबद्दल ही माहिती दिली. नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांचे प्रतिनिधी चंद्रकांत चौधरी यांनी विद्यार्थ्यांना नशाबंदी संदर्भातील गीत शिकवले. श्री मधुकर दादा नारखेडे यांनी विद्यार्थ्याना व्यसनापासून आणि अमली पदार्थांच्या सेवना पासून दूर राहण्याचे आवाहन केले.
मार्गदर्शन सत्राच्या नंतर महाराष्ट्र नशाबंदी मंडळाने पुरवलेल्या पोस्टर्स चे प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आले. या प्रसंगी प्रा डॉ दयाघन राणे, श्री चंद्रकांत चौधरी व श्री मयूर महाजन यांनी विद्यार्थी विद्यार्थिनींना पोस्टर्स मधील माहिती समजावून दिली.
या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे सूत्र संचालन विद्यालयाचे उपशिक्षक श्री आर् ए सुरणार, यांनी प्रास्ताविक श्री गिरीश पाटील यांनी तर आभार शिक्षक जी एम महाजन यांनी मानले. कार्यक्रम प्रसंगी जी एस साळुंखे, जी एम महाजन श्रीमती वैशाली पाटील, श्रीमती मीनाक्षी नारखेडे, तुकाराम नारखेडे, किरण नेहेते व साहिल पाटील उपस्थित होते.