अंजाळे येथील श्री जगन्नाथ महाराज मंदिरात 56 भोग नैवेद्य कार्यक्रम –

यावल : यावल तालुक्यातील अंजाळे येथील श्री जगन्नाथ महाराज मंदिरात सुरू असलेल्या श्री नवनाथ चरित्र संगीत कथा व अखंड हरिनाम संकिर्तन सप्ताहात गुरूवारी 56 भोग नैवेद्य दाखवण्यात आला. हभप वैकुंठवासी जगन्नाथ महाराज समाधी स्थळावर 56 भोग नैवद्य दाखवण्यात आले. या सप्ताहाची समाप्ती मंगळवार, 5 मार्च रोजी दिंडी काढल्यानंतर होणार आहे.

अंजाळेत प्रकटदिन सोहळा
अंजाळे येथे श्री जगन्नाथ महाराज मंदिर आहे. मंदिरात हभप वैकुंठवासी जगन्नाथ महाराज यांचा 110 वा प्रकटदिन सोहळा साजरा होत आहे. या निमित्ताने मंदिरात श्री नवनाथ चरीत्र संगीत कथा व अखंड हरिनाम संकिर्तन सप्ताहाला मोठ्या उत्साहात सुरवात झाली. या सप्ताहात गुरूवारी हभप वैकुंठवासी जगन्नाथ महाराज यांच्या समाधी स्थळावर 56 भोग नैवेद्य दाखवण्यात आला. या प्रसंगी अखिल भारतीय संत समिती कोषाध्यक्ष श्री श्री 1008 महामंडलेश्वर श्री जनार्दन हरीजी महाराज, जगन्नाथ महाराज संस्थान अंजाळेचे गादिपती ह.भ.प.धनराज महाराज, ह.भ.प.ऋषिकेश महाराज द्धदत्त मंदिर रावेर), ह.भ.प.भरत महाराज म्हैसवाडीकर, विणेकरी ह.भ.प. चिंतामण महाराज, ह.भ.प.जितेंद्र महाराज सोयगावकर, ह.भ.प.रत्नाकर महाराज, जगन्नाथ महाराज संस्थान अध्यक्ष दीपक चौधरी, राजू राणे सुरत सह समस्त ब्राम्हण वृंद व पंचक्रोशीतील सर्व जगन्नाथ महाराज शिष्यवृंद उपस्थित होते. सप्ताहाची सांगता मंगळवार, 5 मार्च रोजी होणार आहे. या निमित्ताने गावात दिंडी सोहळा होईल. हभप धनराज महाराज यांचे काल्याचे कीर्तन होईल.