भुसावळ –भुसावळात यावल येथील एकास दोन गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुसासह पोलिसांनी ताब्यात घेतले असून बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

शहरातील पांडुरंग टॉकीजच्या मागील दगडी पुलाजवळ एक इसम केटीएम 125 कंपनीची मोटार सायकल घेवुन त्याच्या कब्जात गावठी पिस्टल बाळगुन कोणता तरी गंभीर स्वरुपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांना मिळाली . यावरून त्यांनी पोलीस उपनिरीक्षक राजु सांगळे,पोलीस नाईक निलेश चौधरी, प्रशांत परदेशी, प्रशांत सोनार अंशानी या इसमाचा शोध घेतला असता तो पांडुरंग टॉकीजच्या मागे दगडी पुला जवळ रोडवर केटीएम 125 कंपनीची मोटार सायकल वर बसलेला पोलीस पथकास आढळून आला पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले दरम्यान कसून चौकशी केली असता देवानंद विकास कोळी (वय.२०) वर्ष राहणार तुकाराम नगर,पाडळसा ता.यावल असे संशयीत आरोपीचे नाव असून त्याचे ताब्यातून दोन गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस व मोटरसायकल असे एकूण 1,15,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यास आला आहे. पोलीस नाईक निलेश चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी,अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन पडघन,पोलीस उपनिरीक्षक राजु सांगळे, पोलीस नाईक निलेश चौधरी,प्रशांत परदेशी, प्रशांत सोनार अशांनी केली आहे.


