मास्टर क्रिकेट लीग सद्दाम सीसीने पटकावला : अरशद सय्यदला मालिकावीरचा किताब : भुसावळचे मैदान गाजवणारे २५ वर्षा नंतर खेळले एकत्र ; जुन्या आठवणींना उजाळा :

भुसावळ:- शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर ज्या खेळाडूंनी ९० च्या दशकामध्ये मैदान गाजवून आज स्पोर्ट्स कोट्याच्या माध्यमातून विविध शासकीय सेवेत उच्चपदस्थ कार्यरत आहे, अशा खेळाडूंनी खेळाडूंची एक दिवसीय मास्टर क्रिकेट लीग स्पर्धेचे आयोजन जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेच्या सहकार्याने करण्यात आले होते. स्पर्धेत दहा संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम सामना रायझिंग स्टार व सद्दाम सीसी या संघात झाला. शेवटच्या चेंडूवर तीन धावांची आवश्यकता असताना अरशद सय्यद यांनी षटकार लावत अंतिम सामना जिंकून दिला . अरशद सय्यदलाच सामनावीर व मालिकावीर खिताब देण्यात आला. स्पर्धेनिमित्त जुन्या आठवणींना उजाळा मिळाला होता.. 90 च्या दशकामध्ये त्यावेळच्या डीएस मैदानावर मैदान गाजवणारे खेळाडूंनी गेट-टुगेदर व्हावे या उद्देशाने 25 रोजी एक दिवसीय मास्टर क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले होते .स्पर्धेत फाईव्ह स्टार ,सद्दाम सीसी, रायझिंग स्टार, डीएसए, आशा, ब्लू डायमंड, सुपर इलेव्हन, स्टार सीसी, शिवनेरी, जय भवानी या नामांकित संघाचे खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. सकाळपासून सुरू झालेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी संध्याकाळी पार पडला शेवटचा अंतिम सामना हा बॅड लाईट पाहता चार ओव्हरचा ठेवण्यात आला होता. यात प्रथम फलंदाजी करताना रायझिंग स्टार ने 43 धावा केल्या होत्या व सद्दामसीसी ला 44 धावांचा लक्ष देण्यात आले , धावसंख्येचा पाठलाग करताना अतिशय रोमहर्षक व चुरशीचा झालेल्या सामन्यात अंतिम सामन्याच्या अंतिम चेंडूत तीन धावांची आवश्यकता असताना अरशद सय्यद यांनी शेवटच्या चेंडूवर षटकार लावत सामना जिंकून दिला व एकच जल्लोष मैदानात झाला. अरशद सय्यदच्य अष्टपैलू कामगिरीच्या ची दखल घेत त्यास मालिकावीर तसेच अंतिम सामन्यात सामन्यातील सामनावीर घोषित करण्यात आले स्पर्धेचे आयोजन जाकीर बागवान, राजू भोई, समीरकर, यशवंत चौधरी हर्षद सय्यद यांनी पुढाकार घेतला होता. स्पर्धेत पंच म्हणून राजू अहिरे राजेश पाटील अनंत नंदन समालोचक म्हणून उमाकांत बाविस्कर, प्रेम व गुणलेखक म्हणून संजय सोनवणे यांनी काम बघितले .संजय पाटील राजू भोई, जाकिर बागवान, विवेन रॉड्रिक्स, रमण भोळे, समीर कर, कैलास शेळके जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे सचिव वासेफ पटेल यांच्यासह संपूर्ण टीमने स्पर्धा यशस्वीरिता पार पाडावी यासाठी यासाठी सहकार्य केले.