वृक्षाचे रोप लावून रक्षा व अस्थिविसर्जन करून कांबळे परिवाराने दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश : पर्यावरण जागर प्रतिष्ठानची संकल्पना :


भुसावळ- तालुक्याच्या कंडारी गावतील प्रसिद्ध सर्पतज्ञ, पर्यावरण प्रेमी , वन्य प्राणी संवर्धन करणारे मित्रवर्य सतिष जी कांबळे यांच्या आई ताराबाई भगवान कांबळे यांचे दि
२३/२/ २0२४ रोजी हदयविकाराने निधन झाले.
त्यांच्या आईचे अस्थी व रक्षा यांचे विसर्जन नदीत न करता अस्थी व रक्षा विसर्जनातून स्मृतीचे वृक्ष लावण्याचे कांबळे परिवाराचा मोठा मुलगा सतिष व
पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे (महाराष्ट्र राज्य) कार्यवाह नाना पाटील सर यांनी परंपरेप्रमाणे नदीपात्रात अस्थी व रक्षा विसर्जनाने पर्यावरणास मोठी हानी पोहचते व नदीचे जल ही प्रदुषित होते, हे कांबळे कुटुंबियास समजल्याने आणि कांबळे कुटुंबातील प्रमुख सतिष पर्यावरण प्रेमी या विचारसरणी चा असल्याने त्यांनीच आईच्या स्मृती कायम वृक्षाच्या रूपात राहतील त्यांनी ही परिवाराला सांगितले . वडीलाच्या वेळेलाही त्यानी स्मृतीचे वृक्ष लावलेले आहे ते वृक्ष ही कायम वडीलाची स्मृती जागृत करत असते असे त्यांनी सांगितले त्याच प्रमाणे समाजाने जनतेने ही अस्थी रक्षा विसर्जन हे वृक्ष लावून करावे असे आवाहन सतिष कांबळे यांनी या प्रसंगी केले. ज्या ज्या चांगल्या वस्तू साड्या कपडे इतर ज्या आपण चांगल्या नव्या असतांनाही इतरत्र फेकून देतो त्या वस्तू गरजू व्यक्तिंना दिल्या जाव्या किंवा इतर कार्यांसाठी वापर केला जावा जेणेकरून ज्या ठिकाणी अंतिमसंस्कार केले जातात त्या परिसरात अस्वच्छता निर्माण होणार नाही इतरत्र कपडे वस्तू घाण होऊन त्या जागेला अस्वच्छते चे स्वरूप निर्माण होणार नाही . पर्यावरण जागर प्रतिष्ठान चे नाना पाटील सर यांनी या प्रसंगी बहुमोल सहकार्य केले . परिवारालाही उपक्रम समजाऊन सांगितला. या वेळी कांबळे परिवारातील सतिष कांबळे नितीन कांबळे प्रशांत कांबळे, वैशाली,कांबळे,रामेश्वर कांबळे,सारिका कांबळे,नातवंड शौर्य,अक्षद,वंशिका,
वैधवी अंशीका,काका नारायण कांबळे,माया कांबळे,रमेश कांबळे,नारबदा कांबळे, कृष्णा अहिरे, अर्चना अहिरे,गौरव अहिरे,आदी उपस्थित होते .
कांबळे परिवाराने अस्थी व रक्षा विसर्जनातून आईच्या स्मृतीचे वडाचे वृक्ष लावून पर्यावरणाचे रक्षण वृक्षसंवर्धन करून या सोबतच जलप्रदुषण टाळले व समाजात एक चांगला संदेश देण्याचा उपक्रम केल्याने पर्यावरण जागर प्रतिष्ठान च्या वतीने नाना पाटील सर यांनी त्यांचे आभार मानले .