खामगाव येथे सोनसाखळी चोरणारा चोरटा जळगाव एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यता :

जळगाव – खामगावातील सोनसाखळी चोरटा जळगाव एमआयडीसी गुन्हे शोध पथकाच्या पोलिसांनी सोमवार रोजी ताब्यता घेतला आहे . याबाबत शिवाजीनगर खामगाव जिल्हा बुलाढाणा गुरनं.43/2024 भादवि कलम-392,34 प्रमाणे दिनांक 11.02.2024 रोजी गुन्हा दाखल आहे

गुन्हांतील फिर्यादी शोभाबाई सुभाषराव खैरे वय-
65, रा. केशवनगर खामगाव यांचे दिनाक 11.02.2024 रोजी 11.30 वाजेच्या सुमारास खामगाव येथील आईसाईब
मंगलकार्यालया समोरुन 20,000/- रु किंमतीची सोन्याची पोत दोन अज्ञात इसमांनी मोटारसाकलवर येथुन जबरी
हिसकावून घेतले याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
दिनांक 12.02.2024 रोजी दुपारी 1 वाजेदरम्यान यातील संशयीत रेकॉर्डवरील आरोपी प्रशांत उर्फ
चोर बाप्या पंडीत साबळे वय-31, रा. सुप्रिम कॉलनी जळगाव यांची पोलीस निरीक्षक बबन मारुती आव्हाड
यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरुन गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनी भागातुन
सापळा रचुन पकडले असुन पुढील तपास पोहेकॉ निलसिंग चव्हाण शिवाजीनगर खामगाव बुलढाणा यांचा ताब्यात
देण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही जळगाव पोलीस अधिक्षक डॉ महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधिक्षक
अशोक नखाते व .उपविभागिय पोलीस अधिकारी संदीप गावित तसेच .पोलीस
निरीक्षक बबन मारुती आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस उप निरीक्षक दिपक जगदाडे, परी पोउप निरीक्षक अशोक काळे, सफौ अतुल वंजारी, पोहेकॉ गणेश शिरसाळे, अल्ताफ पठाण, पोना विकास सातदिवे, पोना किशोर पाटील, पोना योगेश बारी, पोना सचिन पाटील, पोकॉ छगन तायडे राहुल रगडे, किरण पाटील, मुकेश पाटील अशांनी केली आहे.