भुसावळ – येथील तु. स. झोपे गुरुजी प्राथमिक विद्यामंदिरातील शिक्षिका तथा सुप्रसिद्ध कवयित्री सौ. संध्या ललितकुमार भोळे यांच्या जावे गुंफित अक्षरे या पहिल्याच काव्यसंग्रहाला काव्यलेखनाचा बहिणाई सोपानदेव वाङ्मय पुरस्कार जाहीर झाला आहे. सतरावे बहिणाई सोपानदेव खानदेश मराठी साहित्य संमेलन जळगाव येथे 11 फेब्रुवारी 2024 रोजी पार पडत आहे. यानिमित्ताने बहिणाई सोपानदेव वाङ्मय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. त्यात काव्यलेखनात प्रथम पुरस्कार सौ. संध्या ललितकुमार भोळे यांच्या जावे गुंफित अक्षरे या पहिल्याच काव्यसंग्रहाला जाहीर करण्यात आला आहे. अशी माहिती संमेलनाचे निमंत्रक डॉ. विलास नारखेडे, लीलाधर नारखेडे, तुषार वाघुळदे, विजय लुल्हे, रघुनाथ राणे डॉ. संजय पाटील यांनी दिली आहे. पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह व सन्मानचिन्ह असे असून समारंभात सदर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पहिल्याच काव्यसंग्रहाला पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.



