वरणगाव – शहरातील नगर परिषदेने प्रभाग क्रमांक चौदा मधील जीर्ण झालेले महिला शौचालय पाडून नवीन बांधकाम करण्याचे मक्तेदारास काम दिले आहे मात्र जुन्या कामावर नवीन काम दाखविण्याचा प्रयत्न मक्तेदारा कडून होत असल्याची तक्रार प्रशसाकाकडे करण्यात आली असून संपूर्ण बांधकाम नव्याने करण्याची मागणी करण्यात आली आहे

याबाबत असे शहरातील प्रभाग क्रमांक चौदा मधील प्रतिभानगर मध्ये जिर्ण झालेले महिला शौचालय पाडून नवीन बांधकाम करण्याने नगर परिषदेने मक्तेदारास दिलेले असून ते काम करण्यास सुरुवात झाली आहे मात्र जुने बांधकाम व सेफ्टी टॅक नपाडता त्यावरच नवीन बांधकाम झाल्या सारखे दाखविण्याचा प्रयत्न केला जात असून एक प्रकारे मक्तेदारा कडून नगर परिषदेची व रहिवाशाची फसवणुक करून शासना कडून अर्थीक लूट केली जात असल्याची तक्रार स्थानिक रहिवाशी विजय बाजीराव सोनवणे यांनी प्रशासक अर्पीत चव्हाण यांच्या कडे लेखी तक्रार केली असून सदर मक्तेदार व नगर परिषदेचा अधिकारी संगनमत करून दिशाभूल करीत आहेत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे


