भुसावळ – प्रवाश्यांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे पुढील विशेष गाड्यांची मुदत वाढवणार आहे:

ट्रेन क्र.०९०५१ मुंबई सेंट्रल – भुसावळ दि. ३०.०१.२०२४ पर्यंत त्री -साप्ताहिक विशेष अधिसूचित आता दि. २७.०२.२०२४ पर्यंत धावण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
ट्रेन क्रमांक ०९०५२ भुसावळ – मुंबई सेंट्रल त्री -साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. ३१.०१.२०२४ पर्यंत आता दि. २८.०२.२०२४ पर्यंत धावण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
ट्रेन क्र. ०७६३७ तिरुपती – साई नगर शिर्डी साप्ताहिक विशेष दि. ०४.०२.२०२४ ते दि. ३१.०३.२०२४ पर्यंत धावण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
ट्रेन क्र. ०७६३८ साई नगर शिर्डी – तिरुपती साप्ताहिक विशेष दि. ०५.०२.२०२४ ते दि. ०१.०४.२०२४ पर्यंत धावण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
ट्रेन क्र. ०७११५ हैदराबाद – जयपूर साप्ताहिक विशेष दि. ०२.०२.२०२४ ते दि. २९.०३.२०२४ पर्यंत धावण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
ट्रेन क्र. ०७११६ जयपूर – हैदराबाद साप्ताहिक विशेष दि. ०४.०२.२०२४ ते दि. ३१.०३.२०२४ पर्यंत धावण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
वर नमूद केलेल्या गाड्यांच्या वेळा, संरचना आणि थांब्यांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
आरक्षण: विशेष ट्रेन क्रमांक ०९०५२ विशेष शुल्कासह दि. ०१.०२.२०२४ रोजी सर्व संगणकीकृत केंद्रावर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर उघडतील.
या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.
प्रवाशांनी विशेष रेल्वे सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


