मुक्ताईनगर :- तालुक्यातील पिंप्री आकरुत येथे *भारतीय बौद्ध महासभा जळगाव पुर्व शाखा अंर्तगत मुक्ताईनगर तालुका शाखा वतीने दिनांक ३०/०१/२०२४ रोजी दुपारी २:०० वाजता दहा दिवसीय उपासिका प्रशिक्षण शिबीराचा सांगता निरोप समारोप संपन्न झाला. त्या शिबिरास प्रमुख मार्गदर्शिका जळगाव जिल्ह्याच्या जिल्हा सरचिटणीस व केंद्रीय शिक्षिका वैशाली सरदार हया होत्या

त्यावेळी प्रमुख महिला जिल्हा अध्यक्ष प्रियंका अहिरे, राज्य संघटक के. वाय. सुरवाडे, जिल्हा संघटक प्रकाश सरदार, महिला जिल्हा संघटक भारती तायडे,मुक्ताईनगर तालुका सचिव जनार्दन बोदडे, उपाध्यक्ष प्रमोद इंगळे कोषध्यक्ष पी. डी. सपकाळे, शाहीर आर. आर. धुरंदर, वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा सचिव विश्वनाथ मोरे, तालुका अध्यक्ष दिलीप पोहेकर, आर. एन. पो्हेकर, सरपंच अशोक सोनवणे, बौद्धचार्य पंडित महाले, संजय म्हसाने ,किशोर पोहेकर,इत्यादी उपस्थिती होते. . तसेच सर्व जिल्हा/तालुका पदाधिकारी/समता सैनिक दल पदाधिकारी/केंद्रीय शिक्षक/बौध्दाचार्य/माजी श्रामणेर/बौद्ध, गावातील उपासक व उपासिका यांनी उपास्थिती दिली.सदर शिबीर मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष रविंद्र मोरे याच्या मार्गदर्शना खाली घेण्यात आले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दीक्षा सोनावणे यांनी केले* कार्यक्रम यशस्वीते साठी सुजाता गुरचळ, अरुणा सोनावणे, अनिता सोनवणे, संगीता शिरसोवे, सुनीता सोनवणे,सुमन निकम, सोनाली शिरतुरे इंदुबाई सोनवणे इत्यादी नी परिश्रम घेतले.





