भुसावळ – श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ भुसावळ संचलित महाराणा प्रताप विद्यालय भुसावळ या शाळेची शैक्षणिक सहल यशस्वीपणे संपन्न झाली. विद्यार्थ्यांना आपल्या विविध राज्यातील भाषा, संस्कृती आणि चालीरीतीचा अभ्यास व्हावा म्हणून या सहलीचे आयोजन करण्यात आले होते. सदरील सहल हि दिल्ली-अमृतसर- वाघा बॉर्डर येथे 17 जानेवारी 2024 ते 23 जानेवारी 2024 या सात दिवसाच्या कालावधीत यशस्वीरित्या संपन्न झाली. यामध्ये विद्यार्थ्यांनी अमृतसर येथे सुवर्ण मंदिर, जालियनवाला बाग, दुर्गीयांना मंदिर, लाल देवी मंदिर, वैष्णोदेवी मंदिर, रामतीर्थ (लव-कुश) यांची जन्मभूमी, वाघा बॉर्डर, घुमान येथील संत नामदेवांची समाधी या धार्मिक, अध्यात्मिक, ऐतिहासिक, भौगोलिक, राष्ट्रीय स्थानांना भेट दिली तसेच दिल्ली येथील इंडिया गेट, कर्तव्य पथ, राष्ट्रीय सैनिकांचे स्मारक, लाल किल्ला, राजघाट, इंदिरा गांधी संग्रहालय, नेहरू प्लॅनेटोरियम, सायन्स सिटी, नॅशनल झूलॉजिकल पार्क, अक्षरधाम मंदिर, या धार्मिक अध्यात्मिक भौगोलिक राष्ट्रीय स्थानांना भेट दिली .या सहलीमध्ये 96 विद्यार्थी व 06 शिक्षक सहभागी होते या सहलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवीन राज्यातील संस्कृती तेथील बोलीभाषा तेथील लोकांचे राहणीमान तिथले भौगोलिक वातावरण व त्या त्या भागातील महत्त्वाच्या ठिकाणांची ओळख व्हावी व आपल्या भारताची गौरवशाली, वैभवशाली परंपरा ज्ञात व्हावी हा उद्देश संस्थाचालक बापूसाहेब मांडे, संस्था अध्यक्ष सोनु मांडे सचिव श्रीमती उषा पाटील यांनी डोळ्यासमोर ठेवून परराज्यातील या शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यासाठी शिक्षकांना तसेच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले .व त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही शैक्षणिक सहल शाळेचे मुख्याध्यापक सुरेश शिंदे पर्यवेक्षक नारायण घोडके सहल प्रमुख योगीराज जोशी उपसहल प्रमुख सुधाकर सपकाळे सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनी व पालक यांच्या सहकार्याने संपन्न झाली.



