बिलासपूर येथील राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत कथक नृत्यात नुपूर भालेराव द्वितीय : भालेराव दाम्पत्याचा कलारत्न राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान :



भुसावळ- छत्तीसगड येथे २७ ते २९ जानेवारी २०२४ दरम्यान कला विकास केंद्र व न्युज हब इन्सायड केअर फाऊंडेशन बिलासपूर यांच्यातर्फे अखिल भारतीय शास्त्रीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात भुसावळ येथील नुपूर कथक डान्स अँकॅडमी ची नुपूर भालेराव हिला लहान गटात कथक नृत्यात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले . पारितोषिक स्वरूपात स्मृतिचिन्ह आणि प्रशस्ती पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. या वेळी आयोजित राष्ट्रीय नृत्य मोहोत्सवत रमाकांत भालेराव व चारू भालेराव यांनी कथक नृत्य सादर केले. या साठी त्यांना राष्ट्रीय कलारत्न मंजुषा या पुरस्काराने गौरविण्यात आले.

बिलासपूर चे आमदार व माजी मंत्री अमर अग्रवाल यांचे हस्ते शाल श्रीफळ सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या वेळी कला विकास केंद्र चे सुनील वैष्णव , वासंती वैष्णव व न्युज हब चे पंकज खंडेलवाल उपस्थित होते.या स्पर्धेत आणि अनेक राज्यातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. मोहोत्सवात कथक,भरतनाट्यम,ओडिसी, अशा अनेक कलावंतांना आमंत्रित करण्यात आले होते, सदर कार्यक्रम बी. टी. सी. कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला. या यशामुळे भालेराव कुटुंबीयांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.