भुसावळ –जळगाव येथील रहिवासी ७६ वर्षीय बापाने नात्याला काळिमा फासत आपल्या सावत्र २५ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना भुसावळात उघडकीस आली असून पीडित मुलीने पोलिस ठाण्यात धाव घेऊन नराधम बापाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे . भुसावळ शहरातील साकरी फाटा रोडवरील दर्डा कॉलनी सेंट पॉल हायस्कुलच्या मागे संशयित आरोपी सावत्र बाप सुरेश त्र्यंबक पाटील (वय ७६) याचे घर आहे मूळ राहणार कांचन नगर,विजय किराणा जवळ जळगांव येथे राहतात . भुसावळ येथील त्यांच्या मालकीच्या घरामध्ये जळगांव येथील पंचवीस वर्षीय पीडित सावत्र मुलीस वेळोवेळी घर खर्चासाठी, कपडे घेण्यासाठी व पीडित महिलेच्या मुलांचे चांगले शिक्षणाचे आमिष दाखवून वेळोवेळी माहे ते सप्टेंबर २०२३ तारीख नक्की माहीत नाही या दरम्यान अत्याचार केला . याबाबत फिर्यादी पीडितेने बाजारपेठ पोलीस स्टेशनला दिनांक २७ जानेवारी रोजी केलेल्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोउप.निरी मंगेश बेंडकोळी करीत आहे.



