गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

भुसावळ (प्रतिनिधी )-
-येथील गंगाराम प्लॉट भागातील ३२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दि.२७ फेब्रुवारी गुरुवार रोजी सकाळी ८-३० वाजेदरम्‍यान घडली.
शहरातील गंगाराम प्लॉट भागातील रहिवासी पंकज सुरेश सोनवणे(वय ३२)हा
हातमजुरीचे काम करतो. त्‍याने आत्महत्या का केली असावी याचे अद्याप कारण समजे शकले नाही. याबाबतची माहिती बाजारपेठ पोलिसांना कळवल्यानंतर त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. बाजारपेठ पोलिसात अकस्‍मात मृत्‍यूची नोंद करण्‍यात आली आहे.
मयताच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,मुलगी व भाऊ असा परीवार आहे.
नगरसेवक पिंटू कोठारी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे आदींनी देखील त्वरित धाव घेवून सांत्वना केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *