भुसावळ (प्रतिनिधी )-
राष्ट्रीय शिक्षा समिती संचलित बियाणी माध्यमिक विद्यालय,भुसावळ येथे २७ रोजी कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी कवी कुसुमाग्रज यांच्या जीवनपटावरील माहीती मनस्वी सपकाळे हीने करून दिली. शाळेच्या मुख्याध्यापिका सोफिया फ्रान्सिस यांनी गुलाबपुष्प व भेटकार्ड देऊन मराठी भाषा शिकविण्याऱ्या शिक्षकांचा सत्कार केला. मराठी भाषेतील महान लेखक,कवी यांचा थोडक्यात परिचय करून दिला. तसेच आज पूर्ण व्यवहार मराठी भाषेतच करण्यात यावा असे सांगण्यात आले आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



