भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा पूर्वची जिल्हा कोअर कमिटी बैठक संपन्न

भुसावळ - आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या सुचने नुसार भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा पूर्वची जिल्हा कोअर कमिटी बैठक भुसावळ येथे स्व.पुंडलिक गणपत बऱ्हाटे विद्यालय येथे संपन्न झाली.

सदरील बैठक रावेर लोकसभा निवडणूक समन्वयक माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या विशेष उपस्थितीत जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली.
बैठकीत गाव चलो अभियाना सह पक्षाकडून आलेल्या आगामी विविध कार्यक्रमांच्या नियोजना संदर्भात चर्चा झाली.

बैठकीस रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, भारतीय जनता पार्टी लोकसभा निवडणूक प्रमुख नंदकिशोर महाजन, प्रदेश सचिव अजय भोळे, विधानसभा निवडणूक प्रमुख अशोक कांडेलकर, चंद्रकांत बाविस्कर,गोविंद सैंदाणे, सुरेश धनके, हिराभाऊ चौधरी, राकेश पाटील, परिक्षित बऱ्हाटे, आतिश झाल्टे, हरलाल कोळी, वैशाली कुलकर्णी, महेश चौधरी, नरेंद्र पाटील, चंद्रशेखर पाटील, युवराज लोणारी, प्रशांत पाटील, मोहन शर्मा, प्रफुल्ल जवरे, मधुकर राणे, शैलेश मिरगे, गजानन भिकाजी, ज्ञानदेव वाघोदे, कार्यालय मंत्री गणेश माळी यांची उपस्थिती होती