भुसावळ - येथील भुसावळ कला, विज्ञान, आणि पी. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष हिवाळी शिबिर वराडसिम या दत्तक गावात दिनांक 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2024 या कालावधीत *सक्षम युवा समर्थ भारत* या संकल्पनेवर आधारित आयोजित करण्यात आले आहे.
रविवार रोजी विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक हे उपस्थित होते. त्यांच्यासमवेत ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश फालक शिबिराच्या उद्घाटनास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उद्घाटक शहीद सैनिक कुटुंब सदस्य सौ. ममता पाटील ह्या उपस्थित होत्या. तसेच पंडित नेहरू विद्यालयाचे अध्यक्ष अशोक किसन पाटील व चेअरमन अरुण एकनाथ वाणी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.एस.व्ही. पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.आर. एस. नाडेकर यांनी सादर केले. विद्येची देवता सरस्वती माता व महात्मा गांधीं यांच्या प्रतिमेला माल्यार्पन करून व दीपप्रज्वलन करून शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.
यानंतर शिबीराचे उद्घाटक शहिद सुन सौ.ममता पाटील यांनी शिबिराचे उद्घाटन झाले असे जाहीर केले व शिबीराला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्डॉ.मोहन फालक यांनीही शिबीराला शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित पाहूण्यानीही शिबीराला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एस. व्ही. पाटील यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.ममता पाटील यांनी केले. व आभार प्रदर्शन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. विलास महिरे यांनी केले.
तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.आर.एस.नाडेकर, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी व्ही.एन.महिरे, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.ममता पाटील उपस्थिती होते. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या सल्लागार समितीचे सदस्य श्री.उमेश पाटील उपस्थित होते. कार्यक्रमात राष्ट्रिय सेवा योजनेचे स्वयंसेवक प्रफुल्ल वाघमारे, अश्विनी झोपे, गोविंदा बावस्कर, गौरी ढाके इ. उपस्थित होते.