भुसावळ – शहरात अयोध्या येथील प्रभू श्री राम यांचे मूर्तिची प्राणप्रतिष्ठा निमित्त आणि सणानिमित्त शहरातील खडकारोड, जामनेर रोड, काझी प्लॉट व शहरातील विविध ठिकाणी असलेल्या दुभाजकामध्ये व कॉलनीत मोठ्या प्रमाणवर पालिकेची परवानगी न घेता लावलेले फलक, फोटो येत्या २४ तासांच्या आत काढून घ्यावे, अन्यथा संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा पालिकेतर्फे मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी दिला आहे.

भुसावळ शहरातील विविध भागात आणि दुभाजकांमध्ये पताका, झेंडे व शुभेच्छा बॅनर लावण्यात आले आहे. हे झेंडे, पताका व बॅनर मनोरुग्णांकडून अथवा वारा वादळामुळे खाली पडून फाटून लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, संबंधितांनी 24 तासाचे आत विना परवानगीने लावलेले झेंडे, पताका व बॅनर काढून घ्यावे, अन्यथा संबंधितांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात येईल, व होणाऱ्या नुकसानीस संबंधित स्वतः जबाबदार राहणार आहे, असा इशारा मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी दिला आ


