भुसावळ – येथील लीनेस क्लबच्या प्रेसिडेंट पदी सौ प्रियंका किरण चौधरी यांची निवड करण्यात आली . तर सेक्रेटरी पदी लीनेस उज्वला बागूल , व लीनेस ट्रेझरर प्रचना तांबोळी यांची निवड करण्यात आली .

लीनेस प्रियंका चौधरी यांचे निवासस्थानी नुकताच लीनेसचा पदग्रहण सोहळा व हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला . प्रसंगी जळगाव येथील रीझन चेअर पर्सन लीनेस दर्शना ललवाणी व पास्ट डिस्टिक्र प्रेसिडंट लिनेस लता बनवट उपस्थित होत्या . यावेळी मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले .लीनेस प्रतिज्ञाचे वाचन उज्वला बागुल यांनी केले . प्रसंगी रीझन चेअर पर्सन लीनेस दर्शना ललवाणी व पास्ट डिस्टिक्र प्रेसिडंट लिनेस लता बनवट, भुसावळ लीनेस प्रेसिडेंट प्रियंका चौधरी यांनी मनोगतातून लीनेस चे कार्य व महती विषद केली . यावेळी नवनियुक्त लीनेस पदाधिकारी यांना लता बनवट यांनी शपथ दिली .
दरम्यान उपस्थित महिलांनी मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करीत उखाणे घेऊन सौभाग्याचे वाण लुटले . हळदीकुंकू , तिळगुळ व वाण (भेटवस्तू ) देण्यात महिलांचा सन्मान करण्यात आला . मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या .
भुसावळ लीनेस नवनिर्वाचीत कार्यकारिणी अशी –
प्रेसिडेंट पदी लीनेस प्रियंका किरण चौधरी यांची निवड करण्यात आली . तर सेक्रेटरी पदी लीनेस उज्वला बागूल ,ट्रेझरर लीनेस प्रचना तांबोळी , यांचेसह अन्य पदाधिकारी लीनेस मनिषा धांडे, पल्लवी जाधव , आरती बार वसे ,अजिता वडनेरे , आरती ठाकूर ,उज्वला पाटील, रीना गायकवाड , जया इंगळे अनिता इंगळे
कविता महाले आदीचा समावेश आहे नवनियुक्तांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे
[







