अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी श्रीरामप्रभूची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यासाठी राज्यातील रा. स्व. संघाचे स्वयंसेवक, संघाचे शताब्दी विस्तारक महादेव गायकवाड व कोकण विभागाचे कार्यवाहक विठ्ठल कांबळे यांची सपत्नीक निवड करण्यात आली. आयोध्या येथे देशभरातील 11 जणांची निवड करण्यात आली असून त्यापैकी महाराष्ट्रातील दोन जणांचा समावेश आहे. महादेव गायकवाड हे मूळचे का काक्रंबा, जिल्हा धाराशिव येथील अशी असून ते सेवानिवृत्ती शिक्षक आहेत. 1990 पासून ते रा.स्व. संघाशी जोडले गेले आहेत. 21 जानेवारी रोजी अयोध्यात पोहचून 22 जानेवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास ते उपस्थित राहणार आहेत.याबद्दल त्यांचे भटके विमुक्त जाती जमाती समाजातर्फे अभीनंदन तथा शुभेच्छा दिल्या. यामध्ये भटके विमुक्त समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक तथा कैकाडी समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक रवींद्र गायकवाड व भटके विमुक्त बहुजन वंचित संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अरुण धनगर, लियाकत शाह भुसावल, तालुका अध्यक्ष भगवान वंजारी, उपाध्यक्ष रफिक पठाण, भास्कर पालीमकर, बंडू कपाटे, राजेश गुंमळकर, जितेंद्र भोई, देविदास गोसावी, सदाशिव भराडी, मोतीलाल जोगी गुरुजी, कवी घनश्याम भुते, अंकुश गायकवाड, राजाराम वंजारी, संतोष ठोके, रवी पालीमकर, संपत पवार, रविन्द्र सालकर, दुलचद भोई, अवि जाधव, नथू पवार, श्रावण गुंमळकर, रवी गायकवाड, किरण भुसांडे आदी पदाधिकारी त्याचप्रमाणे भटके विमुक्त बहुजन वंचित संघटनेचे महिला आघाडी तालुकाध्यक्ष भारतीताई कापसे आदींनी अभिनंदन तथा शुभेच्छा दिल्या.



