भुसावळ – ज्याप्रमाणे संत जगनाडे महाराज यांनी समाज सुधारण्याचे महान कार्य करून मानवतेची शिकवण दिली त्याचप्रमाणे प्रत्येकाने संतांची शिकवण आचरणात आणावी असे आवाहन समाजभूषण अनिलभाऊ चौधरी यांनी मनोगत व्यक्त करतांना केले . समाजसेवेसाठी व समाजकार्यासाठी एकजूट व एकसंघ होऊन कार्य करा असेही यावेळी चौधरी म्हणाले . तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथि तेली समाज तर्फे खड़का रोड येथील समाज भुवन येथे साजरी करण्यात आली .
यावेळी माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिलभाऊ चौधरी यांचे हस्ते दीपप्रज्वलन करण्यात येऊन प्रतिमा पूजन करण्यात आले उपस्थितांनी श्री संत जगनाडे महाराज यांना अभिवादन केले .
व्यासपीठावर अनिलभाऊ चौधरी, संजय चौधरी कैलाश चौधरी गणेश सोनवणे सचिन पाटिल उपस्थित होते
दरम्यान संजय चौधरी यांनी समाज कार्यावर भर देऊन आपन समाज ऋण फेडावे असे आवाहन केले
कार्यक्रमाचे सूत्र संचालन सचिव अशोक चौधरी यांनी केले
कार्यक्रमात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते
सामाजिक कार्यकर्ता संतोष चौधरी(दाढ़ी) शंकर चौधरी, उमाकांत चौधरी, नारायण चौधरी, दौलत चौधरी, सुरेश गंथडे यांचे सह सर्व समाज बांधव यांचेसह महिलां मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय चौधरी, सुरेश चौधरी,अशोक चौधरी,सुधाकर पाटील, सुनिल सर ,गणेश सोनवणे , बाळू चौधरी, देविदास चौधरी, किरण चौधरी, गोपाळ चौधरी,सुभाष चौधरी, नरेंद्र चौधरी ,दिलीप चौधरी ,प्रदीप चौधरी ,विजय चौधरी, सुनील चौधरी, व राकेश चौधरी यांनी अथक परिश्रम घेतले





