जळगावात आयटीआय जवळ भीषण अपघात : पत्नीचा मृत्यू पती गंभीर जखमी :

जळगाव ; राष्ट्रीय महामार्गावर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ शुक्रवार, ५ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास) सेवानिवृत्त शिक्षक गुणवंत पाटील व त्यांची पत्नी त्यांच्या पुतण्याचा अपघात झाल्याने त्याला पाहण्यासाठी हे दोघे कोल्हे नगरमध्ये जात असताना .त्यांच्या दुचाकीला भरधावं अवजड वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पुष्पा गुण‌वंत पाटील (६६, रा. प्रेमनगर) यांचे जागीच निधन झाले तर . त्यांचे पती गुणवंत पाटील (७०, रा. प्रेमनगर) हे जखमी झाले.

पुतण्याचा अपघात झाल्याने त्याला पाहण्यासाठी हे दोघे कोल्हे नगरमध्ये जात असताना .त्यांच्या दुचाकीला भरधावं अवजड वाहनाने धडक दिली ते खाली पडले त्या वेळी त्यांना काही वाहनधारकांनी तातडीने खासगी रुग्णालयात नेले. तेथे गुणवंत पाटील यांना दाखल करून घेण्यात आले तर पुष्पा पाटील यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणुका भंगाळे यांनी त्यांना मयत घोषित केले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईक व परिसरातील नागरिकांची रुग्णालयात गर्दी झाली होती. मयत पुष्पा पाटील यांना एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई आहे. मुलगा मुंबई येथे नोकरीला आहे.