भुसावळ – येथील प्रसिद्ध उद्योजक मनोज बियाणी यांची भारतीय जनता पार्टी
व्यापारी आघाडी महाराष्ट्र प्रकोष्ठच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी, व्यापारी आघाडी महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष विरेंद्र कुकरेजा यांनी नियुक्ती पत्र दिले आहे .

बियाणी यांनी आपल्या कौशल्याने स्थानिय वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शना खाली
संघठन वाढविण्याकरीता प्रयत्न करावे व व्यापार क्षेत्रातील समस्या सरकार दरबारी
मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याकरीता या क्षेत्रातील जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना
भाजप मधे जोडण्याचा सतत प्रयत्न कराल, ही अपेक्षा विरेंद्र कुकरेजा यांनी व्यक्त करीत पुढील वाटचालि करीता शुभेच्छा दिल्या आहेत . या नियुक्ती बद्दल मनोज बियाणी यांचे आमदार संजय सावकारे , यांचेसह भाजप शहर अध्यक्ष युवराज लोणारी यांचेसह सर्वंस्तरातून विविध संघटनांनी , राजकीय पक्ष पदाधिकारी नगरसेवकं व नागरिक व व्यापारी संघटनांनी यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छाचा वर्षाव होत आहे


