इंडियन रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी तयार करणार ‘सुपर अ‍ॅप

इंडियन रेल्वे आपल्या प्रवाशांच्या सोयीसाठी एक सुपर अ‍ॅप तयार करणार आहे. यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी लोकांना फायदा होणार आहे. रेल्वेचं तिकीट बुक करणे, रेल्वे ट्रॅक करणे, जेवण ऑर्डर करणे, तक्रार दाखल करणे, आणि अशाच अनेक सुविधा या एकाच अ‍ॅपवर उपलब्ध करण्यात येणार आहे.

एका सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, यासाठी रेल्वे मंत्रालयाने ९० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. रेल्वेची आयटी विंग, म्हणजेच CRIS या अ‍ॅपची निर्मिती करणार आहे. एबीपीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

काय असणार अ‍ॅपमध्ये ?
नवीन सुपर अ‍ॅपमध्ये रेल मदत, UTS, नॅशनल ट्रेन एन्क्वायरी सिस्टीम, पोर्टरीड, सतर्क, IRCTC रेल कनेक्ट, IRCTC ई-केटरिंग, IRCTC एअर अशा कित्येक सुविधा इंटिग्रेट होणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टींसाठी युजर्सला वेगवेगळे अ‍ॅप्स घ्यावे लागणार नाहीत.