१ जानेवारी पासून रेशन दुकानदार जाणार संपावर :तहसीलदार निता लबडे यांना दिले दुकानदारांनी निवेदन; प्रलंबीत विविध मागण्यासाठी दुकाने ठेवणार बंद :

वरणगाव – अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार केरोसीन परवानाधारक महासंघ पुणे तसेच ऑल इंडिया फेयर प्राइस डीलर्स फेडरेशन नवी दिल्ली यांच्यावतीने १ जानेवारी २०२४ पासून बेमुदत उपोषण संपावर जाण्याचा इशारा इशारा देण्यात आला आहे.

याबाबत भुसावळ तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटना यांच्यावतीने तहसीलदार नीता लबडे यांना भुसावळ तालुक्यातील सर्व रेशन दुकानदार यांनी येत्या १ जानेवारी 2024 पासून प्रलंबित विविध मागण्यांसाठी आपापले दुकाने बंद ठेवून या संपात आंदोलनात सहभागी होणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
तहसीलदार निता लबडे यांना भुसावळ तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष महिंद्र सपकाळे, जिल्हा सचिव सुनील अंभोरे, कैलास उपाध्याय, प्रकाश निकम, तालुका उपाध्यक्ष सी. आर. पाटील, तालुका सचिव उल्हास भारसके, तालुका संघटक ईश्वर पवार, संतोष माळी, यशवंत बनसोडे, पंकज पाटील, नारायण वाणी, आरिफ मीर्जा, राजेश सैनी, उमाकांत शर्मा अनिता आंबेकर यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले.