भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राचा नवीन विक्रम :

भुसावळ – औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर कार्यान्वित झाल्यापासून एका दिवसात कोळशाच्या 587 वॅगन खाली करण्यात कोळसा विभागाला दि 26.12.2023 रोजी यश आले आहे.

मुख्य अभियंता मोहन आव्हाड आणि उपमुख्य अभियंता (CHP) . रवींद्र सोनकुसरे यांच्या मार्गदर्शनामुळे व कोळसा हाताळणी विभागातील कार्यकारी अभियंता तसेच सर्व अभियंते, कर्मचारी व कंत्राटी कामगार यांच्या परिश्रमातून हा विक्रम झाला.

टीम कोहावी ने एका दिवसात 587 वॅगन अनलोड केल्या आहेत व 01.12.2023 रोजीच्या एका दिवसात मागील सर्वोत्कृष्ट 506 वॅगनला मागे टाकले.

हा विक्रम पूर्ण करण्यासाठी कोहावि ने जे परिश्रम घेतले ते प्रचंड होते. ऊर्जेची पातळी आणि कामातील प्रामाणिकपणा दिसून आला तो अनुकरणीय होता. यामुळे भूऔविके चा कामाचा उच्च दर्जा निर्माण झाला आहे.

भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राचे प्रमुख मुख्य अभियंता श्री मोहनजी आव्हाड साहेब यांनी कोहावी च्या सर्व अभियंते कर्मचारी व कंत्राटी कामगार यांचे अभिनंदन व कौतुक केले.