बिडी बंडलावर बुद्धच नाव व फोटोचा भारतीय बोद्ध महासभेकडून जाहीर निषेध

भुसावळ :- तेलंगणा राज्यातील कोरूटल येथील जे. जी. अँड सन्स कंपनीने स्पेशल गौतम नावाची बिडी काढून त्यावर विश्ववंदनीय तथागात भगवान गौतम बुद्ध यांचा फोटो टाकून जगातील संपूर्ण बुद्ध ला मानणाऱ्या लोंकानाच्या भावनांनाला ठेच पोहचली यांचा जळगांव जिल्हया पूर्व ची भारतीय बोद्ध महासभेने त्रिव शब्दात जाहीर निषेध नोंदवीला आहे.
याबत चे निवेदन मा जिल्हाधिकारी यांना मा. प्रांत अधिकारी, भुसावळ यांच्या मार्फत महिला जिल्हा अध्यक्ष प्रियांका अहिरे व जिल्हा सरचिटणीस वैशाली सरदार याच्या नै्तृत्व खाली निषेध निवेदन देण्यात आले.भगवान पंचशील मध्ये पाचवे शील हे मानवाने सर्व प्रकारच्या नशे पासून अलिप्त राहावे असा संदेश दिला आहे. परंतु सदर कंपनीने हेतू परस्पर आमच्या धार्मिक भावना दुखविल्या गेल्या यांचा भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल यांनी जाहीर निषेध नोंदविला.
. त्यावेळी महिला उपाध्यक्ष संस्कार विभाग सुमित्रा सर्वतकर, जिल्हा संघटक वनमाला हिवाळे, उपाध्यक्ष संरक्षण विभाग समता सैनिक दल च्या करुणा नरवाडे,जिल्हा हिशोबतपासणीस सुमंगल अहिरे, भुसावळ तालुका उपाध्यक्ष संस्कार विभाग चे आनंदमित्र सपकाळे व जिल्हा संघटक प्रकाश सरदार, सुनिल आराक इत्यादी च्या निवेदनावर सह्य केलेल्या होत्या.

..