मनुस्मृती चे दहन बाबासाहेबानी का केले ? – माईसाहेब महाराज पाटील

बोदवड :-वंचित बहुजन महिला आघाडी तर्फे जिल्हात बोदवड महिला तालुका आघाडी ने साकला कॉलोनी मध्ये “मनुस्मृती दहन व स्त्री मुक्ती दिन परिषद 25 डिसेंबर 23 रोजी

” घेण्यात आली त्यावेळी परिषद चे अध्यक्ष वंदना सोनवणे,प्रमुख उपस्थिती जिल्हा अध्यक्ष शामिभा पाटील, यांच्यासह मुख्य वक्त्या राष्ट्रीय समाज प्रबोनकार माईसाहेब महाराज पाटील हया उपस्थित होत्या.

या वेळी माईसाहेब महाराज पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की , “जगातील पुस्तका करीता घर बांधणार व मुलाप्रमाणे पुस्तकावर प्रेम करणारा व्यक्ती बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मुर्ती चे दहन का? केले. मनुस्मुर्ती मध्ये महिलांचे व शुद्राचे स्थान काय या बाबत मनुस्मृती च्या श्लोका सह संपूर्ण विश्लेषण केले आणि या ग्रंथात महिला बाबत किती अमानवी कृत्य लिहिले आहे. जगात याच कोणताही मनुष्य समर्थन करणार नाही. म्हणून बाबासाहेब नी 25 डिसेंबर 1927 साली मनुस्मृती चे सार्वजनिक दहन केले होते आणि महिलांना या अमानवी रूढीतून मुक्त केले म्हणून आम्ही सर्वांनी 25 डिसेंबर हा दिवस महिला मुक्ती दिन म्हणून साजरा केला पाहिजे.”
भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा सरचिटणीस वैशाली सरदार, जिल्हा महासचिव वंदना आराक, जिल्हा उपाध्यक्ष मीरा वानखेडे, रमादेवी पाटील, युवा जिल्हा अध्यक्ष बाळा पवार,बी. के. बोदडे सर,प्रकाश सरदार,बोदवड महिला तालुका अध्यक्ष प्रमिला बोदडे, जिल्हा सचिव सुनीता पालावे, बेबाबाई गायकवाड, सिंधू निकम,रेखा बोदडे, जिजाबाई गायकवाड,तालुका अध्यक्ष सुपडा निकम,युवा अध्यक्ष आशीष गुरचळ,भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष शांताराम मोरे,सिंधू सुरवाडे, संगीता सुरवाडे, रंजना बोदडे,इत्यादी सह मोठया संख्येने महिला उपस्थित होत्या