नाहाटा वाणिज्य महाविद्यालय येथील प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे आणि प्रा. हर्षल विश्वनाथ पाटील सर यांचे पेटंट सादर :


भुसावळ : भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ येथील उपप्राचार्य प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे आणि प्रा. हर्षल विश्वनाथ पाटील सर यांचे पेटंट सादर केले. या पेटंट चे इन्व्हेंशन आहे ते उद्योगसमूह व संशोधनात गोपनीय चर्चेसाठी संरक्षण प्रदान करते . हा जो अविष्कार आहे तो उद्योग वापरकर्त्यांसाठी डिझाइन केलेली मोबाइल कम्युनिकेशन नेटवर्क गोपनीयता संरक्षण पद्धत आणि प्रणाली ऑफर करते. ही पद्धत उद्योग अनुप्रयोगांसाठी सर्वसमावेशक गोपनीयता संरक्षण सुनिश्चित करते, व्यवस्थापन, नियंत्रण आणि वापरकर्ते या तीन स्तरांचा समावेश करते. हे वापरकर्त्याच्या माहितीचे वर्गीकरण करून आणि उद्योग-विशिष्ट गोपनीयता संरक्षण यंत्रणा लागू करून हे साध्य करते.
हे पेटंट पब्लिशिंग साठी सांघिक कार्य केले गेले आहे. संघा शिवाय हे कार्य करणे शक्य नसते. या संघात भारतातील विविध राज्यातील तज्ञ व्यक्तींचा समावेश होता. या मध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, हैद्राबाद, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, या तज्ञांसोबत महाराष्ट्रातून डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य भुसावळ कला विज्ञान आणि पु ओ नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ आणि डॉ वैभव पांडुरंग सोनजे, विभाग प्रमुख कॉम्पुटर अँप्लिकेशन, संदीप युनिव्हर्सिटी नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. हर्षल विश्वनाथ पाटील सर यांनी काम केलेले आहे.
त्यासाठी त्यांना ताप्ती एज्युकेशन सोसायटी भुसावळ चे अध्यक्ष डॉ. मोहन फालक, चेअरमन महेश फालक, सचिव विष्णुभाऊ चौधरी, कोषाध्यक्ष संजीवकुमार नाहटा तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस व्ही पाटील, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए डी गोस्वामी व विभागातील सर्व सहकारी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, आणि डॉ विपीन बोरोले, संदीप युनिव्हर्सिटी नाशिक यांचे सहकार्य लाभले.