प्रशिक्षणात घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी मनापासून करा- डॉ. सौ संगीता बियाणी

भुसावळ –
भविष्यवेधी शिक्षण ही काळाची गरज आहे मुलाला शिकवण्यापेक्षा ते स्वतः शिकले पाहिजे यामुळे त्याचे ज्ञानार्जन चांगले होते शिक्षकांनी आता वर्गात शिकवण्यापेक्षा नेतृत्व व्यवस्थापन व नियोजन केले पाहिजे. प्रशिक्षणात घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी मनापासून करा असे प्रतिपादन बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या सचिव डॉ. सौ संगीता बियाणी यांनी अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन प्रशिक्षणाच्या पाच दिवशीय समारोपप्रसंगी बियाणी मिलिटरी स्कूल या ठिकाणी शिक्षकांना आवाहन केले.

तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांचे 150 शिक्षक, शिक्षिका प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाले होते.
तीन टप्प्यात आयोजित केलेल्या या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा दिनांक 12 ते 16 डिसेंबर दरम्यान संपन्न झाला या शिबिराचा समारोप असंगी बोलताना त्या म्हणाल्या आपले अनुकरण विद्यार्थी करतात शिक्षकांमध्ये आत्मविश्वास असला पाहिजे ही विद्यार्थी अध्ययनात मागे पडली त्यांच्यासाठी या शिकलेल्या बाबींचा उपयोग केल्यास नक्कीच मूल शिकू शकते

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी होते. बियाणी एज्युकेशन ग्रुप शैक्षणिक उपक्रमांना नेहमीच सहकार्य करीत असतो व करीत राहील असे सांगून प्रशिक्षणातील मिळालेल्या नवीन माहितीचा उपयोग विद्यार्थी हितासाठी करावा असे त्यांनी आवाहन केले.

व्यासपीठावर गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे ,प्राचार्य डी एम पाटील, सुलभक एस एस अहिरे, राज्य विज्ञान परिषदेचे सुनील वानखेडे, नितीन भालेराव, कैलास पाटील, निलेश पाटील, अशोक तायडे ,गुणवंत पाटील, राहुल भारंबे,अशपाक खान, यांनी पाच दिवस या प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन केले
प्रशिक्षण यशस्वीतेसाठी शिक्षण विस्ताराधिकारी तुषार प्रधान बी डी धाडी विषयतज्ञ सचिन पाटील, संजय गायकवाड केंद्रप्रमुख आशिक हुसेन ,निलेश लोखंडे, राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष गिरीश एस नेमाडे यांनी परिश्रम घेतले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अमित चौधरी यांनी तर आभार प्रदीप साखरे यांनी मानले.

शंभर टक्के गुणवत्तेसाठी प्रयत्न – किशोर वायकोळे गटशिक्षणाधिकारी :
तालुक्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी प्रशिक्षणात मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करा निपुण भारतची अंमलबजावणी 100% करावयाची आहे .मागील चार चाचण्यात भुसावळ तालुका हा अव्वल आहे यामुळे प्रत्येक मूल शिकले पाहिजे मुलांना सर्व अध्ययन क्षमता प्राप्त झाल्या पाहिजेत