भुसावळ विभागात द्वितिय पेन्शन अदालतचे आयोजन :

भुसावळ विभागातील सेवानिवृत्त कर्मचारीच्या तक्रारी संदर्भात दिनांक . 15.12.2023 रोजी भुसावल मंडळ येथील कृष्णचंद्र सभागृहा मध्ये वर्ष 2023 च्या द्वितिय पेन्शन अदालतचे आयोजन करण्यात आले.सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या समस्यांचे निवारण करण्याकरिता वर्षातुन दोन वेळा पेन्शन अदालतचे आयोजन करण्यात येते. सबंधित पेन्शन अदालत आयोजित करण्याकरिता तिन महिन्यापुर्वी सुचना देउन आवेदन मागविन्यात येतात ।वर्ष 2023च्या द्वितिय पेन्शन अदालत मध्ये एकूण 138 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यात 17 तक्रारी पेमेंट सबंधित नव्हत्या व 12 तक्रारी पेमेंट सबंधित होत्या,पेन्शन अदालत मध्ये एकुन रू. 12,88,047/- रक्कम पेन्शनर्सच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आली आणि 37 पी.पी.ओ.चे व परिवार पेन्शनचे रिव्हीजन केले. तसेच प्रशासनाने पेन्शनर्सच्या तक्रारीचे संपुर्ण निराकरन केले ।पेन्शन अदालतमध्ये मुख्य न्यायाधीश,मंडल रेल प्रबंधक श्रीमती इति पाण्डेय, अपर मंडल रेल प्रबंधक (प्रशासन) श्री सुनील कुमार सुमन तसेच लेखा व कार्मिक विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी श्री एन.एस.काज़ी यांनी केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहाय्यक कार्मिक अधिकारी श्री विरेंद्र वडनेरे यांनी केले. तसेच पेन्शनर्स असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते ।पेन्शन अदालतमध्ये मंडल रेल प्रबंधक यांनी पेन्शनर्सना भविष्यात त्रास होणार नाही याकरीता प्राप्त तक्रारी वेळेवर सोडवण्यात येतील याची पेन्शनर्सना शाश्वती दिली ।कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहाय्यक कार्मिक अधिकारी अतुल रायकवार यांनी केले.कार्यक्रम यशस्वितेसाठी सेटलमेंट आणि लेखा विभागातील कर्मचारी तसेच सर्व कल्याण निरीक्षक यांनी सहकार्य केले.