मुक्ताईनगर-
तालुका विधी सेवा समिती, मुक्ताईनगर , मुक्ताईनगर तालुका वकील संघ व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कामाच्या ठिकाणी होणारे महिलांचे लैंगिक शोषण प्रतिबंध कायदा आणि कामाच्या ठिकाणी महिलांसाठी असणार्या सुविधा याविषयी कायदेविषयक शिबिर आज दि.८/१२/२०२३ रोजी संत मुक्ताई शुगर & इनर्जी ली.घोडसगाव (साखर कारखाना) व उसतोडणी होत असल्याल्या शेत मळ्यात पार पडले., यावेळी एम.ए.पाखरे (बेलदार) संरक्षण अधिकारी (प्र) मुक्ताईनगर, मुक्ताईनगर तालुका विधीसेवा समिती व वकील संघातर्फे कायदेविषयक मार्गदर्शनासाठी अँड. संतोष टी. कोळी, सौ.सुवर्णा पाटील पो. कॉ.पो.स्टेशन, मुक्ताईनगर,पुजा बडगुजर ( केसवर्कर सखी वन स्टॉप, जळगाव) अमृत देवरे (जनरल मॅनेजर संत मुक्ताई शुगर & इनर्जी ली. घोडसगांव) शेख असगर सहाय्यक अभय केंद्र, मुक्ताईनगर, मुक्ताईनगर शुगर & इनर्जी ली. मधील कामगार , कारखाना केनयार्ड मधील उसतोड कामगार व कामाच्या ठिकाणी शेतातील उसतोड कामगार, इ. उपस्थित होते. याप्रसंगी अँड. संतोष टी. कोळी यांनी उपस्थितांना कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगीक शोषण प्रतिबंध कायदा, विषाखा समिती, कामगार कायद्यानुसार महिलांना कामाच्या ठिकाणी मिळणार्या सुविधा, पाळणाघरं, इ. विषयांवर कायदेशिर मार्गदर्शन केले., तसेच महिला व बालविकास अधिकारी श्री.बेलदार यांनी शासनामार्फत महिला कामगारांसाठी राबविल्या जाणार्या योजनांविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.




