अंधार पडला,बस चुकली शालेय विद्यार्थी व विद्यार्थीनी पोहोचले आमदारांकडे : विद्यार्थ्यांसाठी बस पोहोचली चक्क आमदारांच्या दारात :

मुक्ताईनगर – मुक्ताईनगर ते माळेगाव ही सव्वा पाच वाजेची बस सात वाजेपर्यंत मुक्ताईनगर बसस्थानकात आलीच नाही. त्यामुळे पाचवी ते सातवी च्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पायीच आमदार चंद्रकांत पाटलांचे घर गाठले. मुलांचा हा मोर्चा आमदारांच्या दारात पोहोचताच आ. पाटील यांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेतली. मुक्ताईनगर आगार प्रमुखांना फोन केला व बस थेट घरा जवळ मागवली आणि विद्यार्थ्यांना माळेगावच्या बस मध्ये बसविले. दररोज बसला उशीर होत असल्याने यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या सूचना देखील केल्या. विद्यार्थ्यांना पायपीट करत पुन्हा बस स्थानकात पाठवण्या ऐवजी आमदार चंद्रकांत पाटील यांनी आगार प्रमुखांना बस आपल्या निवासस्थानीच पाठविण्याचे आदेश दिले. व त्या नुसार आमदार यांच्या निवासस्थानावरूनच बस विद्यार्थ्यांना घेऊन माळेगाव कडे निघाली.