बेताल वक्तव्याचा निषेध : भुसावळ भाजपा युवा मोर्चाने जाळला काँग्रेस नेते प्रियांक खरर्गेंचा पुतळा –

भुसावळ : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे चिरंजी तथा कर्नाटकातले काँग्रेसचे मंत्री प्रियांक खरगे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ शहरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्याजवळ शुक्रवारी सकाळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रियांक खरगे यांच्या पुतळ्यास चपला मारल्यानंतर निषेधासाठी प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खरगे यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली तसेच ‘स्वातंत्र्यवीर सावरकर अमर रहे’च्या घोषणा दिल्या
यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस परीक्षीत बर्‍हाटे, उपाध्यक्ष सतीश सपकाळे, नवनियुक्त शहराध्यक्ष युवराज लोणारी तसेच युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अनिरुद्ध कुळकर्णी यांच्यासह सरचिटणीस श्रेयस इंगळे, अथर्व पांडे, नंदकिशोर बडगुजर, उपाध्यक्ष गोपीसिंग राजपूत, सचिन सपकाळे, गौरव लोणारी, चेतन बोरोले, शहर सरचिटणीस संदीप सुरवाडे, रमाशंकर दुबे, महिला मोर्चाच्या शैलजा पाटील, मनीषा पाटील, शेखर धांडे, राहुल तायडे, माजी नगरसेवक अजय नागराणी, निक्की बात्रा, रवी सपकाळे, प्रा.दिनेश राठी, किरण कोलते, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, चंद्रशेखर अग्रवाल, भावेश चौधरी, प्रमोद पाटील, प्रवीण इखणकर, शिशिर जावळे, शंकर शेळके, पराग भोळे, सागर जाधव, चंद्रशेखर पाटील आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.