वरणगांव – वरणगाव नगरपालिका स्थलांतर होणार असलेल्या रेस्ट हाऊस जवळील इमारतीची प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी पाहणी करून नगरपालिका कार्यालय स्थलांतराबाबतच्या चर्चा सुरु झाल्यानंतर नगरपालिका स्थलांतर कृती समिती पुन्हा आक्रमक झाली आहे .
समितीने वरणगाव नगरपरिषदेच्या कार्यालयात जाऊन घोषणाबाजी केली असून नगरपालिका कार्यालय स्थलांतरित होऊ देणार नाही असे सांगितले आहे
या इमारतीस शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या कारणाने हे नगरपालिका स्थलांतरित करण्यात येत असल्याचे सांगितले जाते , परंतु या कार्यालयाचे वेळोवेळी नूतनीकरण झाल्याने या इमारतीला शंभर वर्षे झाले असे म्हणता येत नाही असे कृती समितीतील सदस्य अजय पाटील यांनी सांगितले आहे .
तसेच महेश सोनवणे यांनी सांगितले की 70 ते 80 टक्के लोक या परिसरात असून ते नगरपालिका स्थलांतरित करण्याच्या विरोधात आहे ,त्यामुळे नगरपालिकेचे कार्यालय गैरसोयीच्या जागी स्थलांतरित करू नये .
याप्रसंगी अशपाक काझी यांनी सुद्धा विरोध दर्शवला असून कार्यालय स्थलांतरित झाल्यास मोठे आंदोलन उभे राहणार असल्याचे सांगितले यावेळी कृती समितीचे सदस्य शशिकांत चौधरी भास्कर गवळी इतर सदस्य उपस्थित होते .



