भालोद – सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय,
भालोद येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ पुरस्कृत
“बहिणाबाई अभ्यासिका ” दि. १ डिसेंबर २०२३ शुक्रवार पासुन सुरू होत आहे.
परिसरातील नियमित व बहिस्थः विद्यार्थ्यांना परिक्षांची, विविध स्पर्धा परिक्षेची व
प्रशासकीय सेवेमध्ये संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने परिक्षांच्या पूर्व तयारी
करिता भालोद महाविद्यालयामध्ये स्वतंत्र वाचन कक्षाची निर्मिती करण्यात
आलेली असुन त्याला “ बहिणाबाई अभ्यासिका ” असे नाव दिलेले आहे. तरी
या संधीचा फायदा परिसरातील विद्यार्थी व नागरीकांनी घ्यावा असे आवाहन
महाविद्यालयीन परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे.

यासाठी नियमावली पुढील प्रमाणे असून यात
महाविद्यालयात प्रवेशीत विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे ओळखपत्र बघून बहिणाबाई अभ्यासिकेत विनामूल्य प्रवेश देण्यात येईल. महाविद्यालया बाहेरील स्पर्धा परिक्षा किंवा इतर परिक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अभ्यासिकेत प्रवेश हवा
असल्यास विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यात अर्ज भरून द्यावा. त्यासाठी नाममात्र शुल्क घेतले जाईल.
अभ्यासिकेची वेळ स. ७.०० ते रात्री ९.०० असेल.
अभ्यिसिकेमध्ये स्पर्धा परिक्षेची पुरेशी पुस्तके उपलब्ध आहेत. तसेच स्पर्धा परिक्षेची मासिके आणि पत्र उपलब्ध आहेत.
अभ्यासिकेत विजपुरवठा व शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध असेल.
अभ्यासिके मध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांची नोंद रजिस्टर मध्ये येण्याची व जाण्याची वेळ सह नोंद करणे बंधनकारक
असेल. अभ्यासिकेमध्ये कोणत्याही विद्यार्थ्यास मोबाईल द्वारे बोलणे, गाणी ऐकणे, व्हिडीओ पाहणे, एकमेकांशी चर्चा करणे हे करता येणार
नाही. अभ्यासिका संपूर्णपणे सायलेंट झोन मध्ये असेल.
अभ्यासिकेमध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी वाचकाचा संपूर्ण पत्ता, फोन नंबर, मोबाईल नंबर आदी बाबतीत माहिती वाचनकक्षाच्या
दप्तरी जतन करून ठेवली जाईल.अभ्यासिकेत अभ्यासासाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासिकेत खाद्य पदार्थ खाण्यास सक्त मनाई असेल. अभ्यासिकेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपापले वाचन साहित्य मोबाईल, लॅपटॉप बॅग्ज व इतर महागड्या वस्तू स्वतःच्या जबाबदारीवर आणणे व घेऊन जाणे याबाबतची सर्व जबाबदारी विद्यार्थ्यांची राहील.
तरी परिसरातील विद्यार्थी व नागरिक बंधु-भगिनी यांनी अभ्यासिकेचा उपयोग करावा असे आवाहन महाविद्यालय प्राचार्य व चेअरमन प्रा डॉ. के. जी. कोल्हे , समन्वयक डॉ. सुनिल मधुकर नेवे मो. 9823288689 यासह
परिवाराकडून करण्यात आले आहे.


