पारोळा –पारोळा
तालुक्यातील बोळे येथून अंत्यसंस्कार साठी जात असताना
पिकअप कंन्टेनर चा अपघात झाला यात दोन महिलांचा जागीच मृत्यू तर एका महिलेचा गंभीर अवस्थेत धुळे येथे उपचारासाठी जात असताना मृत्यू झाला तर या अपघातात २१ जण जखमी झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की पारोळा तालुक्यातील बोळे येथील २० ते २५ जण शिंदखेडा तालुक्यातील चिलाणे येथे अंत्यविधी साठी जात असताना त्यांच्या पिक अप गाडी ला
पारोळा शहरापासून थोड्या अंतरावर असलेल्या विचखेडे गावाजवळ हा अपघात झाला शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या दरम्यान हि घटना घडली या अपघातात रेखाबाई गणेश कोळी (वय ५५), योगिता रवींद्र पाटील (वय ४०, दोन्ही रा. बोळे ता. पारोळा) यांचा जागीच तर चंदनबाई गिरासे (वय ६५) यांचा उपचारासाठी नेताना मृत्यू झाला याबाबत
बोळे येथील २० ते२५ जण शिंदखेडा तालुक्यातील चिलाणे येथे अंत्यविधीसाठी जात असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील विचखेडे गावानजीक हा भिषण अपघात झाला.बोळे ता. पारोळा येथून चिलाणे ता.शिंदखेडा येथे एका अंत्यसंस्कारसाठी वाहन क्रमांक एम एच १८ एम ५५५४ हे २२ जणांना घेऊन जात होते. सकाळी १२ वाजेच्या सुमारास लोखंडी रोल असलेला एक कंटेनर क्रमांक जीजे १२ बीडब्ल्यू ७२५४ यांच्यांत
अपघात झाला
यात तीन महिलांचा मृत्यू झाला
यात
रेखाबाई गणेश कोळी ५५ योगिता रवींद्र पाटील वय ४० ,चंदनबाई गिरासे (वय ६५) महिलांचा मृतांमध्ये समावेश असून
रणजीत सुरसिंग गिरासे (वय ६०), भरत रामभाऊ गिरासे (वय ६५), राजेशभाई कोळी (वय ४५), भीमकोर सत्तरसिंग गिरासे (वय ५०), भुराबाई मोहनसिंग गिरासे (वय ४०), भुराबाई तात्या गिरासे (वय ४०), रेखाबाई अधिकार गिरासे (वय ५०), नानाभाऊ सुभाष गिरासे (वय ५५), भटाबाई साहेबराव गिरासे (वय ४५), सुनिता गिरासे (वय ४४), भुराबाई भीमसिंग गिरासे, अजतसिंग दादाभाऊ गिरासे (वय ५०), सय्यद लियाकत (वय २१ रा. मालेगाव), हिराबाई विजयसिंह गिरासे (वय ४०), भीमकोरबाई जगत गिरासे (वय ६०), भगवानसिंग नवलसिंग गिरासे (वय ६५), रंजनसिंग भारतसिंग गिरासे (वय ५५), रुपसिंग नवलसिंग गिरासे (वय ६०), दयाबाई रूपसिंग गिरासे (वय ५५), राजेबाई साहेबराव कोळी (वय ४५). आदींचा जखमींमध्ये
समावेश असून यातील पाच जण गंभीर असून त्यांना उपचारासाठी धुळे येथील सामान्य रुग्णालय उपचारासाठी पाठवण्यात आले असून अन्य काही जखमींना जळगाव येथे वैद्यकीय महाविद्यालय उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. तसेच उर्वरित जखमींवर पारोळा येथील खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोलीस उपनिरीक्षक राजु यादव,अमर वसावे, सुनील हटकर, यांच्या सह कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली तिथे लगेच रूग्णवाहिका हि दाखल झाल्या त्वरित जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले.



