जळगाव – तक्रार निवारण सभा डॉ. किरण कुंवर माध्यमिक शिक्षणाधिकारी जि प जळगाव यांच्या कार्यालयात २९ रोजी घेण्यात आली . सभेत राष्ट्रीयकृत बँकेत पगार, प्रलंबित वैयक्तिक मान्यता बदली मान्यता, मुख्याध्यापक वैयक्तिक मान्यता, प्रभारी मुख्याध्यापक मान्यता , विना अनुदानावरून अनुदानावर मान्यता, डीएड वरुन् बीएड वर मान्यता, जीपीएफ/डीसीपीएस हिशोब, रजारोखीकरण, मेडिकल बिल, जीपीएफ परतावा/नापरतावा प्रकरण तसेच काही वैयक्तिक तक्रारी संबंधात सविस्तर चर्चा करण्यात आली. सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.यावेळी शिक्षणाधिकारी यांनी संबंधित सर्व प्रश्न तात्काळ मार्गे लावुन कोणतेही प्रकरण प्रलंबित राहणार नाही याचे आश्वासन सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना दिले. सभेस नारायण वाघ (शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष), तुळशीराम सोनवणे (संचालक ज. जि. पूर्व माध्यमिक पतपेढी), गोविंद पाटील (जिल्हाध्यक्ष शिक्षक सेना),गणेश काकडे (राज्य उपाध्यक्ष प्रोटॉन) किशोर घुले (प्रहार संघटना),पी एस सोनवणे (माजी उपाध्यक्ष माध्यमिक शिक्षक पतपेढी) , सिद्धोधन सोनवणे बहुजन शिक्षक संघटना),आर.जे पाटील (कार्याध्यक्ष), सुनिता पाटील (महिला आघाडी अध्यक्षा),परदेसी (अध्यक्ष कला अध्यापक),चंद्रकांत देशमुख (कार्यवाह) गोकुळ राजपूत (उपाध्यक्ष) शांताराम महाजन (सहकार्यवाह) विलास पाटील (अध्यक्ष भुसावळ) , संतोष कचरे,प्रवीण धनगर, जाधव(RMBKS) ,राहुल पाटील,रोहित तेले व तक्रारदार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




