शालेय शिष्यावृती परीक्षा साठी शिक्षकांची दोन दिवसीय कार्यशाला संपन्न .

वरणगाव , जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा मार्गदर्शक सचनेनुसार तालुक्यात इयत्ता पाचवी,व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा दि .२९ते३० अक्टूबर २०२३ दरम्यान म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे आयोजित करण्यात आली होती सदर कार्यशाळेचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांच्या हस्ते करण्यात आले.सदर प्रसंगी विस्ताराधिकारी बी.डी. धाडी, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉ प्रदीप साखरे, नावीद खाटीक, व सर्व तज्ञ मार्गदर्शक व शिक्षक उपस्थित होते. प्रशिक्षक कार्यशाळे त इयत्ता पाचवी व आठवी चे वर्ग असलेल्या शाळेतील ८९शिक्षक उपस्थित होते पाचवी व आठवी त शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी बसवावे व विद्यार्थी पात्र होण्याचे प्रमाण वाढावे तसेच अभ्यासक्रम व त्याबाबतचे प्रभावी नियोजन कसे करावे याबाबत मार्गदर्शन किशोर वायकुळे व बी.डी.धाडी. शिक्षण विस्तार अधिकारी यांनी उद्घाटनपर भाषणात केले . कार्यशाळेत तज्ञ मार्गदर्शक म्हणून रवींद्र बहाडे योगिता ढाके, जि एस पवार, काशीराम बारेला होते.महेंद्र भंगाळे ,सुरेखा चौधरी , रवींद्र बहाडे भूषण भंडारी यानी काम पहिले आभार प्रदीप सखारे यानी मानले.