भालोद – सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय भालोद येथे आज सत्यशोधक समाजाचे संस्थापक क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला .महात्मा फुले यांचे समाज प्रबोधन व उद्बोधन कार्याची माहिती प्राचार्य डॉ. कोल्हे यांनी दिली.याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.दिनेश पाटील यांनी महात्मा फुले यांचे जीवन व कार्य याविषयी माहिती दिली
तत्कालीन कालखंडात समाज व्यवस्थेला अनमोल असे मार्गदर्शन करून महात्मा फुले यांनी अस्पृश्यता निवारण यासोबतच समाजातील दलित, पीडित ,शोषित ,वंचित आणि विशेषतः स्त्री वर्गासाठी भरीव अशा स्वरूपाचे कार्य केलेले आहे शेतकऱ्यांची व्यथा त्यांनी आपल्या लेखणी द्वारे व्यक्त केलेले आहे एकंदरीतच समाजातील प्रत्येक घटक विकासाच्या शिक्षणाच्या प्रवाहात यावा यासाठी महात्मा फुले यांनी मोलाचे कार्य केलेले आहे .असे ते म्हणाले. सदर कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थी विकास महिला अधिकारी प्रा. मोहिनी तायडे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू, भगिनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांची उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.दिनेश पाटील यांनी केले तर आभार प्रा.मोहिनी तायडे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तुळशीराम पाटील, पंकज नेहेते, मुबारक तडवी यांनी सहकार्य केले.


