भुसावळ – शहरातील महिलांना प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे उद्योजक महिला मेळाव्याच्या माध्यमातून एक सुवर्ण संधी मिळत आहे तसेच महिलांमधील असलेल्या कलागुणांना वाव मिळतोच , त्याच बरोबर त्या करीत असलेल्या व्यवसायाला प्रसिद्धी मिळून एक हक्काचे व्यासपीठ देखील मिळते याचा विशेष आनंद व कौतुक वाटते.या उपक्रमा मुळे नक्कीच यशस्वी उद्योजिका निर्माण होईल असा आशावादही डॉ सौ नेहते यांनी यावेळी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाच्या अध्यक्षा सौ रजनी सावकारे यांनी केले तसेच मेळाव्याला सर्व भुसावळकरांनी आवर्जून भेट देवून तसेच वस्तू व खाद्यवस्तू जास्तीत जास्त प्रमाणात खरेदी करून उद्योजक महिलांना प्रोत्साहन देवून सहकार्य करण्याचे आवाहन केले.
येथील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे दरवर्षप्रमाणे या वर्षी देखील महिला उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्यास भुसावळ तालुक्यातील महिलांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला.
महिलांनी स्वतः तयार केलेल्या विविध प्रकारचे सजावट व आरास करीता लागणारे सामान,दिवाळीचे खमंग स्वादिष्ट रुचकर फराळ,साड्या,ज्वेलरी,घरात लागणारे विविध प्रकारचे प्रोडक्ट तसेच विविध प्रकारच्या लज्जतदार नाष्ट्याची स्टॉल लावलेले आहेत.
येथील ब्राह्मण संघ येथे आयोजित मेळाव्याचे उद्घाटन डॉ सौ नीलिमा नेहते ,तसेच नगरसेविका सोनल महाजन,प्रितमा महाजन,दिपाली बऱ्हाटे,सैलजा नारखेडे, कठोरा च्या सरपंच सौ रोहिणी पाटील,भाजप महिला शहराध्यक्ष अनिता आंबेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ नीलिमा नेहते होत्या प्रतिष्ठा महिला मंडळा तर्फे गेल्या 12 वर्षा पासून दर वर्षी या मेळाव्याचे आयोजन करयात येते म्हणून मंडळाचे भरभरून कौतुक केले.
दिवाळी ला लागणारा सर्व सामान एका छता खाली सहज मिळतो म्हणून उद्योजक महिलाच नाही तर आमच्या सारख्या सर्व महिला या मेळाव्याची आतुरतेने वाट बघतो असेही त्या आवर्जून म्हणाल्या उपक्रमाच्या माध्यमातून शहरातील महिलांना ही एक सुवर्ण संधी मिळत असून त्यांच्यात असलेल्या कलागुणांना वाव मिळतोच ,परंतु त्याच बरोबर त्या करीत असलेल्या व्यवसायाला प्रसिद्धी व एक हक्काचे व्यासपीठ देखील मिळते याचा विशेष आनंद व कौतुक वाटते.या उपक्रमा मुळे नक्कीच यशस्वी उद्योजिका निर्माण होईल असा आशावादही डॉ सौ नेहते यांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाच्या अध्यक्षा सौ रजनी सावकारे यांनी केले तसेच मेळाव्याला सर्व भुसावळकरांनी आवर्जून भेट देवून तसेच वस्तू व खाद्यवस्तू जास्तीत जास्त प्रमाणात खरेदी करून उद्योजक महिलांना प्रोत्साहन देवून सहकार्य करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला आ संजय सावकारे यांचे अमूल्य मार्गदर्शन व सहकार्य लाभते असे आवर्जून सांगितले व संपूर्ण टीम घेत असलेल्या परिश्रमा मुळेच हा उपक्रम दर वर्षी यशस्वीपणे पार पडतो असे म्हणाल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजश्री देशमुख यांनी केले .
यशस्वीते साठी अनिता आंबेकर,सोनल महाजन,जयश्री चौधरी,वैशाली सैतवाल,राजश्री बादशाह ,मनीषा काकडे यांनी परिश्रम घेतले.







