भुसावळ शहरातील मालमत्ता कराचे अन्यायी आकारणी बाबत प्रांताधिकारी यांना निवेदन , भुसावळ – शहरातील मालमत्ता कर विषयी चतुर्थ आकारणी करण्यात आली असून त्याचे पत्रक वाटप करण्यात आले आहेत. या आकारणी पत्रकात काही महत्त्वाच्या मुद्यांवर नागरिकांनी हरकत घेतली असून सदर मालमत्ता कर आकारणी मान्य नाही. ही आकारणी रद्द करण्यात येऊन नव्याने न.पा.कर्मचाऱ्यांकडून योग्य त्या पद्धतीने करावी.अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे . याबाबत आज 1 नोव्हेवर रोजी प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे . यामध्ये १) विशेष शिक्षण कर २) शिक्षण कर ३) मालमत्ता कर ४) जलनिस्सारण कर ५) वृक्षारोपण कर उपरोक्त पाच विषयात संपूर्ण शहराला नाहक भुर्दंड बसत आहे. कारण शैक्षणिक कर दोन वेळा कशासाठी ? मालमत्ता कराची, वृक्षारोपण कर, जलनिस्सारण कर याबाबतीत नागरिकांना समाधान कारक सुविधा उपलब्ध नसताना, पिण्याचे पाणी १०-१० दिवस मिळत नाही. शाळेत योग्य त्या सुविधा नाहीत. आणि आपण आकारणी भरमसाठ केलेली आहे. यामध्ये १५-२० टक्के आणि काहींना यापेक्षाही जास्त अवाजवी आकारणी करण्यात आली आहे. ही अव्वाच्या सव्वा केलेली आकारणी बेकायदेशीर असून अन्यायी आहे. खाजगी ठेकेदाराने चुकीची केलेली आकारणी नागरिकांवर अन्यायकारक आहे. त्यामुळे ही मालमत्ता कर आकारणी मान्य नाही. ही आकारणी रद्द करण्यात येऊन नव्याने न.पा.कर्मचाऱ्यांकडून योग्य त्या पद्धतीने करावी. अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख दिपक धांडे, ब-हाटे,पवन नाले,पिंटू भोई,स्वप्नील सावळे,दिलीप सुरवाडे,यश फालक,मनोज पवार,महमूद शेख,सोनी ठाकूर यांचेसह नागरिकांनी केली आहे