‘द वर्ल्ड स्कूल’ भुसावळ, येथे सरदार वल्लभ भाई पटेल जयंती उत्साहात साजरी


भुसावळ – कोलते फाऊंडेशन संचलित ‘द वर्ल्ड स्कूल’ भुसावळ, येथे सरदार वल्लभ भाई पटेल जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्या निमित्ताने शाळेच्या मुख्यध्यापीका पेट्रीशा ह्यसेट यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. शाळेच्या मुख्याध्यापिकानी मुलांना मार्गदर्शन करतांना सांगितले की भारताचे ‘लोहपुरुष’ म्हूणन ओळखले जाणारे सरदार वल्लभ भाई पटेल यांनी भारतीय एकता व अखंडता निर्माण करण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. या सर्व कार्यक्रमास शाळेचे पर्यवेक्षक व शिक्षकवृंद, कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.