मुक्ताईनगर.-येथील साहित्यिक तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ.भालेराव यांची भुसावळ विभागीय अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 अंतर्गत उपविभागीय दक्षता व सनियंत्रण समिती उपविभागीय अधिकारी भुसावळ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली आहे .या समितीचे सचिव गटविकास अधिकारी भुसावळ हे आहेत तर सदस्य म्हणून पोलीस उपविभागीय अधिकारी भुसावळ मुक्ताईनगर हे सदस्य तर यांचा समावेश आहे.भुसावळ मुक्ताईनगर बोदवड येथील तहसीलदार सदस्य आहेत .या समिती सदस्यांमध्ये रमेश मकासरे, भुसावळ राजू छगन भील बोदवड संजय कौतिक भटकर फेकरी यांचा समावेश आहे. डॉ.भालेराव हे गेल्या वीस वर्षांपासून सामाजिक सलोखा जातीय सलोख्यासाठी काम करीत आहेत.त्या बद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.



