स्पेलिंग व अबॅकस स्पर्धेतील विजेत्यांचा इस्त्रो शास्रज्ञाच्या हस्ते गौरव :


भुसावळ –
भुसावळ येथे ताप्ती पब्लिक स्कूल मधील सभागुहात विद्यार्थ्यांच्या गुणांच्या विकासासाठी विविध स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ इस्रोचे माजी वैज्ञानिक भरतभाई चनेरिया व रमण सायन्स टेक्नालॉजी फाउंडेशन चे अध्यक्ष चंद्रमौली जोशी यांच्या हस्ते संपन्न झाला.
याप्रसंगी व्यासपीठावर एपिजे अब्दुल कलाम यंग सायंटिस्ट चे व्हाईस चेअरमन चे सुनील वानखेडे ,श्री एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राहुल सोनार ,संचालक ओंकार सोनार ,सपना सोनार , माध्यमिक शिक्षक पतपेढी संचालक गोपाळ पाटील व सतीश नवलखे आदी मान्यवर उपस्थित होते

याप्रसंगी दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली
कार्यक्रमात अबॅकस कॉम्प स्पेलिंग कॉम्पिटिशन यासारख्या विविध स्पर्धेत विजेते झालेल्या स्पर्धकांना या मान्यवरांच्या हस्ते आकर्षक ट्रॉफी प्रमाण पत्र देऊन गौरवण्यात आले
याप्रसंगी रमण सायन्स चे चंद्रमौली जोशी यांनी सांगितले की गणित हा विषय सोप्या पद्धतीने सोडवण्याचे तंत्रज्ञान आपल्या देशात विकसित झाले आहे ते आपण अंगीकारतले पाहिजे या पद्धतीचे त्यांनी यावेळी प्रात्यक्षिक सुद्धा करून दाखवले
याप्रसंगी इस्रोचे शास्त्रज्ञ भरतभाई चनेरिया यांनी सांगितले की भारत सध्या विविध अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये अग्रेसर असून इतर देशांपेक्षा आपला देश पुढे जात आहे .
विविध उपग्रह आपण अवकाशात सोडले असून ते सक्षमपणे कार्य करत असून चंद्रयान तीन यशस्वी करून आपण जागतिक विक्रम साध्य केला आहे जगातील सर्व देशांमधून कमी खर्चात सदर चे चंद्रयान तयार करण्यात आले असून याचा आपला सर्व भारतीयांना अभिमान आहे . तसेच इस्रोत सहभागी होण्यासाठी मार्गदर्शन त्यांनी केले
याप्रसंगी राहुल सोनार यांनी प्रास्ताविकास सांगितले की विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुण असतात पण त्याला जागृत करण्यासाठी या प्रकारच्या परीक्षा घ्याव्या लागतात
सुनील वानखेडे यांनी गणिताच्या टीप सांगून विद्यार्थ्यांना गणित विषय सुलभ कसे केले जाते याबद्दल सखोल माहिती दिली .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री देशमुख यांनी केले व आभार सपना देशमुख यांनी के
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अमिता जोशी, यशवंत वाडगावकर, भगवती राजपूत जया वनारा, ईश्वर सोनवणे, तरुणा हळवे धनश्री बोदडे गायत्री बारी, लोचना चौधरी , निकिता चौधरी , सागर अंबुस्कर , शुभम शेळके आदींनी परिश्रम घेतले