भुसावळ – येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात आज दिनांक 30.10.2023 रोजी दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) सुनील कुमार सुमन यांच्या हस्ते सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सचोटीची शपथ देण्यात आली.

अधिकारी आणि कर्मचार्यांनी प्रतिज्ञा घेतली की, ते सदैव सचोटीचे सर्वोच्च मानक राखतील आणि कोणत्याही भ्रष्ट पद्धतींचा भाग होणार नाहीत.
यावेळी सचोटीची शपथ घेण्यासाठी वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी श्री एन.एस.काझी व विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयातील सर्व शाखांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सूत्र संचालन सहाय्यक कार्मिक अधिकारी श्री वीरेंद्र एस. वडनेरे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विभागीय दूरसंचार विभाग, अभियांत्रिकी विभाग आणि कल्याण विभाग यांचे सहकार्य लाभले.
दक्षता जनजागृती सप्ताहादरम्यान निबंध स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, चित्रकला व भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.


