चाळीसगांव स्थानक येथे विशेष पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक



भुसावळ – भुसावळ विभागात चाळीसगांव स्थानक येथे जुना पादचारी पूल पाडण्यासाठी दिनांक- ३१.१०.२०२३ रोजी विशेष पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. अप -डाऊन मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे होणारे परिणाम खालीलप्रमाणे आहेत:
अप मेल/एक्सप्रेस गाड्यांचे नियमन:
• दिनांक- ३१.१०.२०२३:
११०७८ जम्मूतवी- पुणे झेलम एक्सप्रेस वाघळी स्थानक येथे ०८.१५ ते ११.०० वाजेपर्यंत ( ०२.४५ तास) नियमन केले जाईल.
१२१४२ पाटलीपुत्र -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस कजगाव स्थानक येथे ०८.३० ते ११.०० वाजेपर्यंत ( ०२.३० तास) नियमन केले जाईल.
१५०६५ गोरखपूर- पनवेल एक्सप्रेस गाळण स्थानक येथे ०८.४० ते ११.०० वाजेपर्यंत ( ०२.२० तास) नियमन केले जाईल.
११०६० छपरा – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस पाचोरा स्थानक येथे ०८.४५ ते ११.०० वाजेपर्यंत (०२.१५ तास) नियमन केले जाईल.
१२७८० हजरत निजामुद्दीन -वास्को दि गामा गोवा एक्सप्रेस माहेजी स्थानक येथे ०९.५० ते ११.०० वाजेपर्यंत (०१.१० तास) नियमन केले जाईल.
१५०१८ गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस काशी एक्सप्रेस म्हसावद स्थानक येथे १०.३० ते ११.०० वाजेपर्यंत (३० मिनिटे) नियमन केले जाईल.
१५९४६ गुवाहाटी -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस शिरसोली स्थानक येथे १५ मिनिटे नियमन केले जाईल.
डाऊन मेल/एक्सप्रेस गाड्यांचे नियमन:
२०१०३ लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपूर एक्सप्रेस हिरापूर स्थानक येथे २५ मिनिटे नियमन केले जाईल.